गोंदिया पोलीस सायबर दूत वाहन उपक्रम

सायबर सेल गोंदिया तर्फे सायबर जनजागृती उपक्रम. सध्याच्या युगामध्ये सायबर गुन्हयाचे प्रमाण वाढले असल्याने त्यास आळा घालण्याकरीता मा. पोलिस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनात संपुर्ण गोंदिया जिल्हयामध्ये सायबर गुन्हयाविषयी जनजागृती करण्याकरीता सायबर दुत हे वाहन तयार करण्यात आले असुन या वाहनाद्वारे ऑडीओ व व्हिडीओ माध्यमातुन सायबर जनजागृती करण्यात येते तसेच नागरीकांना सायबर सुरक्षेविषयी माहीती पञके देण्यात येत आहेत.